जतचा कॉम्पुटर इंजिनियर वैभव मानेचा महत्वाचा रोल?
कुंभ मेळा अश्लील व्हिडिओ प्रकरण, उच्च शिक्षिताचा मुलगा प्रज्वल तेलीही जतचाच
सांगली : खरा पंचनामा
अहमदाबाद येथील मॅटर्निटी हॉस्पिटलमधील व्हिडिओच्या तपासात कुंभ मेळ्यात संगमावर स्नान करणाऱ्या महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मिडियावर विकणाऱ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील जतमधील कॉम्पुटर इंजिनियर असलेल्या वैभव मानेचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी उच्च शिक्षित पालकांचा मुलगा असलेला प्रज्वल तेली हाही जतचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
वैभव बंडू माने (वय 25, रा. जत, मूळ रा. दारिबडची) असे त्याचे नाव आहे. त्याने इस्लामपूर येथील एका कॉलेजमधून कॉम्प्युटर इंजिनियरची पदवी मिळवली आहे. कॉम्प्युटरमधील पदवीधर असल्यामुळे त्याचा या व्हिडीओ कांडमध्ये महत्वाचा सहभाग असावा असा पोलिसांना संशय आहे. गुजरात पोलिसांनी त्याला गुरुवारी सकाळी जत पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे कसून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले. त्याचे वडील केंद्र शासनाच्या सेवेत असून उत्तर भारतात सेवा बजावत आहेत.
यातील दुसरा संशयित प्रज्वल अशोक तेली (वय 22, रा. जत) हा एका उच्च शिक्षिताचा मुलगा आहे. त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण बंगळूरू येथे झाले. त्यानंतर तो लातूर येथे नीट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेला होता. तेथेच त्याने आणि चिखलीच्या प्राज पाटील यांनी अहमदाबाद येथील मॅटर्निटी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केले. त्याचा तपास करताना गुजरात पोलिसांना कुंभ मेळ्यातील अश्लील व्हिडीओचे कांडही सापडले.
या दोघांसह चंद्रप्रकाश फुलचंद हा व्हिडिओ बनवत होता. तर पाटील आणि तेली यु ट्यूब तसेच टेलिग्रामवर ते व्हिडिओ अपलोड करत होते. शिवाय या व्हिडिओंची ऑनलाईन विक्रीही ते करत असल्याचे गुजरात पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. टेलिग्राम चॅनेल लातूर आणि सांगलीतून चालवले जात होते. दरम्यान या गुन्ह्यात इंजिनियर असलेल्या वैभव माने याचा नेमका कसा सहभाग होता याचा गुजरात पोलीस तपास करत आहेत.
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील जत आणि शिराळा तालुक्यातील तिघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाल्याने केवळ सांगली जिल्हाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.