सांगलीत देशी बनावटीचे पिस्तूल जप्त
मिरजेतील एकाला अटक, विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विश्रामबागमधील वानलेसवाडी येथे एका इमारतीत देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन बसलेल्या मिरजेतील तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल, एक काडतूस असा 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.
अरबाज ऊर्फ इब्राहिम अल्लाउद्दीन रेठरेकर (वय 21, रा. दत्त कॉलनी, सुभाषनगर रोड मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. निरीक्षक भालेराव यांनी अवैधरित्या शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. बुधवारी शिवजयंती असल्याने पथक गस्त घालत होते.
त्यावेळी पथकातील आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी यांना एकजण वानलेसवाडी येथील अपूर्ण इमारतीत पिस्तूल घेऊन बसल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे छापा टाकून रेठरेकर याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केल्यावर त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस सापडले. ते जप्त करून त्याला अटक करण्यात आली.
विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक चेतन माने, संदिप साळुंखे, बिरोबा नरळे, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, कॅप्टन गुंडेवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.