कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी बस चालकाला काळं फासून मारहाण
चित्रदुर्ग : खरा पंचनामा
मागच्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात सीमावादाचा प्रश्न आहे. बेळगाववरुन दोन्ही राज्यात हिंसक आंदोलन झाली आहेत. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावादाच्या प्रश्नावरुन तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. कर्नाटक येथे एसटी महामंडळाच्या एसटी बसला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं.
कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याची देखील माहिती आहे. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का? अशी विचारणा केली. एसटी महामंडळाच्या बसला काळं फासलं. पुणे-बंगळुरु महामार्गावर चित्रदुर्ग इथे ही घटना घडली आहे. सध्या कर्नाटकचा भाग असलेल्या बेळगावातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी मागच्या अनेक वर्षात बरीच आंदोलनं केली. पण कर्नाटकातील सत्ताधाऱ्यांनी राजकीय ताकदीच्या बळावर ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.