Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच! 40 दिवसात 27 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या अशोक काकडे सांगलीचे नवे जिल्हाधिकारी

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच! 
40 दिवसात 27 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
अशोक काकडे सांगलीचे नवे जिल्हाधिकारी 



मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्रात बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. महाराष्ट्र सरकारने 11 फेब्रुवेरी रोजी 4 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. मागच्या 40 दिवसात 27 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे प्रशासकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी अशोक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनात देखील फेरबदल पहायला मिळत आहेत. 2 जानेवारी 2025 रोजी 10 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. 4 फेब्रुवारी 2025 रोजी एकाचवेळी 13 IAS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर आज 11 फेब्रुवारी रोजी चार अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

डॉ कुणाल खेमनार, आयुक्त साखर, पुणे यांची बदली जॉइंट सीईओ एमआयडीसी, मुंबई येथे करण्यात आली आहे. डॉ मंतदा राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली यांची जॉइंट एमडी सिडको नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. अशोक काकडे एमडी सारथी यांची जिल्हाधिकारी सांगली येथे बदली करण्यात आली आहे. अनमोल सागर सीईओ झेडपी लातूर यांची बदली मनपा आयुक्त भिवंडी निजामपूर बहुविध महामंडळात करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.