Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गहाळ झालेले 2.50 लाखांचे तब्बल 16 मोबाईल नागरिकांना दिले परत सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई : निरीक्षक चौगले

गहाळ झालेले 2.50 लाखांचे तब्बल 16 मोबाईल नागरिकांना दिले परत 
सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई : निरीक्षक चौगले



सांगली : खरा पंचनामा 

आठवडी बाजार, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी गहाळ झालेले नागरिकांचे 16 मोबाईल शोधून त्यांना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याहस्ते परत देण्यात आले. या सर्व मोबाईलची किंमत सुमारे 2.50 लाख रुपये असल्याची माहिती सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी दिली.

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारे विविध बाजार, बसस्थानक, गर्दीची ठिकाणे येथे अनेक नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली होती. ते मोबाईल तांत्रिक तसेच अन्य माहितीच्या आधारे शोधण्याच्या सूचना पोलीस उपाधीक्षक एम. विमला यांनी दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक चौगले यांचे पथक गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेत होते.

तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने सांगली तसेच अन्य जिल्ह्यातून मोबाईल शोधून काढले. ते मोबाईल संबंधित नागरिकांना पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निरीक्षक चौगले यांच्याहस्ते परत देण्यात आले. सांगली ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाने निळकंठ, रोहीत साखरे, श्रीमती साळुंखे,  विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.