तृप्ती देसाईंना बीड पोलिसांची नोटीस
26 पोलिस अधिकाऱ्यांवरील आरोपाबाबतचे पुरावे मागितले
बीड : खरा पंचनामा
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. देसाई यांनी बीड पोलिस दलातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आरोप केले होते. परंतु त्याबाबतचे पुरावे दिलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पुरावे घेऊन चौकशीला बोलावलं आहे.
वाल्मिक कराडने त्याच्या मर्जीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन त्यांना बीडमध्ये आणल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. शिवाय काही पोलिस अधिकारी वाल्मिक कराडसाठी काम करत आहेत, असंही त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी २६ पोलिस अधिकाऱ्यांच्या नावांची यादी दिलेली होती.
तृप्ती देसाई यांनी पोलिस कर्मचारी, अधिकारी यांची यादी दिली. मात्र त्याबाबतचे पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. येत्या १७ तारखेला सकाळी साडेअकरा वाजता त्यांना चौकशीला बोलावण्यात आलेलं आहे. तृप्ती देसाई यांनी पोलिसांच्या बाबतीतला तक्रारी अर्ज केला होता.
बीड पोलिस दलामध्ये वाल्मिक कराडने आपल्या मर्जीतील लोक बसवल्याचा गंभीर आरोप यापूर्वी अनेकांनी केलेला आहे. यामध्ये सुरेश धस यांचाही समावेश आहे. त्यामुळे वाल्मिकची बीडमध्ये दहशत वाढली आणि पोलिसांनी त्याच्या गुन्ह्यांकडे कानाडोळा केला, असा आरोप आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही बिंदू नामावलीचा मुद्दा उपस्थित केला होता. परळीमध्ये सगळे पोलिस, महसूल, कृषी आणि इतर विभागातील कर्मचारी वंजारी कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याची यादी जाहीर केली होती. आता त्यांना बीड पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.