बनावट सोन्याद्वारे फायनान्सची फसवणूक करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक
महागड्या कारसह 7.30 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील एका गोल्ड फायनान्स कंपनीत बनावट सोने गहाण ठेवून फसवणूकीच्या तयारीत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक महागडी कार, मोबाईल असा 7.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
गणेश आप्पासाहेब पवार (वय 32), धनाजी रामचंद्र खुडे (वय33), अस्लम बापु देवर्षी वय 22, सर्व रा. रुकडी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरातील सिव्हिल रोडवर मनी टू मी फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. गुरुवारी तिघे संशयित सोने गहाण ठेवून कर्ज घेण्यासाठी या कंपनीच्या कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांच्याकडील सोने बनावट असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक अमोल यादव यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तेथे जाऊन तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून महागडी कार, मोबाईल असा 7.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, सागर होळकर, रफीक मुलाणी, संदीप पाटील, सतिश लिंचळे, संदीप कुंभार, विशाल कोळी, गीतम कांबळे, संतोष गळवे, योगेश सटाले, संदीप कोळी, प्रशांत पुजारी, योगेश हाक्के, दिग्वीजय साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.