Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शाळेतल्या प्रेमप्रकरणातून संसारावर वरवंटा, पत्नीने घेतला पतीचा जीव

शाळेतल्या प्रेमप्रकरणातून संसारावर वरवंटा, पत्नीने घेतला पतीचा जीव



राजगड : खरा पंचनामा

शालेय जीवनातील प्रेमसंबंधांतून महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा घोटत संसारावर वरवंटा फिरविला. पतीचा मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून सारोळा गावच्या हद्दीत फेकून दिला. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून तिने चलाखीचा प्रयत्न केला.

मात्र, राजगड पोलिसांनी मृतदेहाच्या शर्टवरील टॅगनुसार ओळख पटवून गुन्ह्याची उकल केली. याप्रकरणी महिलेसह प्रियकराला अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी उपस्थित होते.

सिद्धेश्वर बंडू भिसे (वय 40, रा. ससाणेनगर, हडपसर, मूळ रा. वडगाववाडी ता. लोहारा, जि. धाराशिव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी योगिता सिद्धेश्वर भिसे (वय 30) आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार (वय 32, रा. अंदुर, ता. तुळजापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भोरमधील सारोळा गावच्या हद्दीत नीरा नदीपात्रात पोत्यात हात-पाय बांधलेला मृतदेह 9 मार्चला आढळला होता. याप्रकरणी राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. मृतदेहाच्या अंगातील शर्टवरील टेलरच्या टॅगवरून पोलिसांनी ओळख पटविली. संबंधित टेलर टॅग लोहारा (जिल्हा धाराशिव) येथील असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी त्याची पत्नी योगिताची चौकशी केली असता, संशय बळावला. प्रियकर शिवाजी सुतार याच्या मदतीने पतीचा खुन केल्याची कबुली तिने दिली. ३ मार्चला सुतार आणि योगिता या दोघांनी मिळून सिद्धेश्वर यांचा खून केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.