कर्नाळच्या रस्त्याबाबत सहा अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल दाखल करा
न्यायालयाचे पोलिसांना आदेश
सांगली : खरा पंचनामा
कर्नाळ (ता. मिरज)) येथील शेतकरी भालचंद्र बाळासाहेब चव्हाण यांच्या शेतातून गेलेला सव्वा आठ फूट रुंदीचा रस्ता व प्लॅन मधील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 126 या रस्त्यावर शेतकऱ्यांची संमती, कब्जेपट्टी हरकत न घेता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील रस्त्याचे काम करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोन महिन्यात अंतिम अहवाल दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सदरचे प्रकरणी मूळ फिर्यादी तर्फे ॲड. कोणार्क पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली.
रस्त्याचे काम करत असताना अस्तित्वातील अडीच मीटर रुंदीपेक्षा जास्त जवळपास 8 ते साडे आठ मीटर रुंदीकरण करून शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीत फौजदारी पात्र अतिक्रमण करून फळझाडे व शेतातील पिकांचे नुकसान करून सदर रस्त्याच्या कामात संबंधित शेतकऱ्यांनी विरोध केला असता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तत्कालीन उपअभियंता व कंत्राटी अभियंत्याने शेतकऱ्यांना शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच पंचायत समिती बांधकाम विभाग मिरज व जिल्हा परिषद बांधकाम विभाग सांगलीच्या तत्कालीन अभियंत्यांनी संबंधित रस्त्याच्या रुंदीचा चुकीचा व खोटा अहवाल शासनास सादर करून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
तसेच शेतकऱ्यांना नुकसान पोहचवण्याचा उद्देशाने कृत्य केले म्हणून शेतकरी भालचंद्र चव्हाण यांनी ग्राहक पंचायत सांगलीचे डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांचे मार्गदर्शनानुसार माहिती अधिकारात कागदपत्रे व अभिलेख मिळवून कोर्टात खाजगी फौजदारी तक्रार दाखल केली होती त्यावर मा. दुसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी संबंधितांचे बाबतीत चौकशीचे आदेश सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांना दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.