पुढाऱ्यांच्या पाया पडू नका, ते त्या लायकीचे नाहीत!
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्याचे पुढारी आणि नेत्यांची लायकी काढणारे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. सध्या लोक आपल्या घरात आई-वडिलांच्या पाया पडणार नाहीत. पण कोणाच्याही पाया पडू शकतात. सध्या अशी एक पद्धतच सुरू झाली असून अनेकजण पुढाऱ्यांच्या पाय देखील पडत आहेत. पण ते पुढारी त्या लायकीचे आहेत का? असा सवाल अजित पवारांनी केला आहे. यावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार म्हणाले, आपल्या पक्षात प्रवेश करणाऱ्या लोकांना उद्देशून बोलताना, पक्षात येणाऱ्यांची प्रतिमा जनतेत चांगली पाहिजे. पण फक्त चुकीचे कामांवर पांघरू घालण्यासाठी पक्षात येत असाल तर प्रवेश मिळणार नाही, असाच सज्जड दम भरला आहे. तर पक्ष प्रवेश करून कोणाला आपल्या चुकीवर पांघरून पडेलं असं वाटतं असेल तर ते डोक्यातून काढून टाका. मी कायद्याचा आदर करणारा आहे, कायदा श्रेष्ठ असून चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं जाणार नाही, अशाही कामपिचक्या त्यांनी दिल्या आहेत.
यावेळी अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, दिशाभूल करून जास्त काही मिळत नाही किंवा केलंलं कामही जास्त काळ टिकत नाही. यामुळे आपण आजही चव्हाण यांच्या विचारांवर चालत असून त्यांच्या विचारांचे आहोत. उद्या जर आपला माणूस चुकला तर कायदा आहे. डॉ. बाबासाहेबांचा कायदा आहे, कोणीही सुटणार नाही. आपण भाषणात जे काही सांगू ते कृतीत आले पाहिजे.
आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत, आपण सगळेजण सारखे आहोत असे समजून काम करूया. पाया पडायच्या नादात पडू नका, अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाही. त्यामुळे पाया पडायच्या नादात पडू नका, असा मोलाचा सल्लाही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.