Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सतीश भोसलेला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी खोक्याचे वकील म्हणाले, खोटे गुन्हे दाखल केले

सतीश भोसलेला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी
खोक्याचे वकील म्हणाले, खोटे गुन्हे दाखल केले



बीड : खरा पंचनामा

काही दिवसापूर्वी बीड येथील सतीश भोसले या आरोपीचे मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर भोसले हा आरोपी फरार झाला होते. दरम्यान, बीड पोलिसांनी त्याला प्रयागनराजमधून अटक केली आहे. तर आज त्याला उत्तर प्रदेशमधून बीड येथे आणण्यात आले आहे. आझ पोलिसांनी सतीश भोसले याला शिरुर येथील कोर्टासमोर आणले. यावेळी कोर्टाने आरोपी भोसले याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोर्टासमोर पोलिसांनी हत्यार तसेच पुरावे गोळा करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. यावेळी कोर्टाने भोसले याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी कोर्टात सतीश भोसले याची बाजू त्याच्या वकीलांनी मांडली. दरम्यान, सुनवानी संपल्यानंतर वकीलांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

सतीश भोसले याचे वकील म्हणाले, पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. पण, न्यायालयाने सहा दिवसांची कोठडी दिली आहे. सरकारी वकीलांनी आरोपी फरार आहे, त्याने वापरलेले हत्यार जप्त करणे आहे म्हणून आम्हाला आरोपी आमच्या ताब्यात पाहिजे आहे, असे मुद्दे मांडले होते. आता आरोपी खोक्याचे घर जाळले आहे मग हत्यारे कुठून ताब्यात घेणार आहेत? वनविभागे त्यांचं घर उद्ध्वस्त केले आहे. त्यांच्या हातात हत्यारच नाही मग काय जप्त करणार आहेत. हा खोटा गुन्हा दाखल केले आहेत. हा गुन्हा घडला त्यावेळी सतीश भोसले शिरुरमध्ये होता. त्यानेच ढाकणे परिवाराला रुग्णालयात दाखल केले, असंही वकीलांनी सांगितलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.