Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हप्ता वसुली केल्याप्रकरणी चार पोलीस अंमलदार निलंबित

हप्ता वसुली केल्याप्रकरणी चार पोलीस अंमलदार निलंबित




धारावी : खरा पंचनामा 

येथे बेकायदेशीर धंदेवाल्या कडून हप्ता वसुली करणे धारावीतील चार पोलीस अंमलदाराना चांगलेच महागात पडले आहे. या हप्ता वसुलीच्या व्हायरल व्हिडीओची दखल पोलीस उपायुक्त यांनी घेतली आहे.

या हप्ता वसुली प्रकरणात चार पोलीस अंमलदार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यामध्ये बीट मार्शल आणि पेट्रोलिंग व्हॅनमधील अंमलदार यांचा समावेश आहे. निलंबनाचे आदेश २८ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे, धारावी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या हप्ता वसुलीमध्ये दोषी ठरवून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी स्थानिकाकडून करण्यात येत आहे.

मुंबईतील धारावी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धंदे, फेरीवाले आणि बेकायदेशीर कृत्य सुरू असून देखील याकडे स्थानिक पोलीस ठाण्याचे नेहमी दुर्लक्ष राहिले आहे. बेकायदेशीर धंद्यामुळे या परिसरात गुन्हेगारी कृत्य मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या परिसरात बेकायदेशीर फेरीवाले आणि धंदे करणाऱ्याची संख्या मोठी असल्यामुळे वाहतूक कोंडी, तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या बेकायदेशीर फेरीवाले यांच्याकडून स्थानिक पोलीस ठाण्यांना मोठ्या प्रमाणात हप्ता दिला जात असल्याची चर्चा होती. ही चर्चा एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रत्यक्षात समोर आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धारावी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार, बीट मार्शल, पेट्रोल व्हॅन वरील अंमलदार फेरीवाले आणि बेकायदेशीर धंदेवाल्याकडून हप्ता घेताना कैद झाले आहे. हा व्हिडीओ डिसेंबर २०२४ मध्ये काढण्यात आला असून या व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे हप्ता वसुली करताना धारावी असून या व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे हप्ता वसुली करताना धारावी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार स्पष्टपणे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये हे स्पष्ट होत आहे की चार पोलिस अंमलदार फेरीवाले यांच्या विरुद्ध कारवाई टाळण्यासाठी लाच घेत होते," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. महेंद्र पुजारी, काशीनाथ गाजरे, गंगाधर खरात आणि अप्पासाहेब वाकचौरे अशी या चार पोलिसांची ओळख पटली आहे. चार पोलिसां विरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती, अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक चौकशीत असे आढळून आले की चारही पोलीस अंमलदार दोषी आढळून आले असून त्यांना निलंबित करण्यात आले.

निलंबनाच्या आदेशात असे म्हटले आहे: "धारावी पोलिस ठाण्यात बीट मार्शल आणि मोबाईल वाहन कर्मचारी म्हणून काम करताना दिसणारा एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता ज्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्याऐवजी फेरीवाले आणि स्टॉल मालकांकडून लाच घेताना दिसत आहे. प्रसारित व्हिडिओमधील कृतींमुळे लोकांमध्ये मुंबई पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, चारही पोलिसांविरुद्ध सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.