Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

न्यायाधीश प्रकरणात नवा ट्वीस्ट; अग्निशमन दलाने दिली वेगळीच माहिती

न्यायाधीश प्रकरणात नवा ट्वीस्ट; अग्निशमन दलाने दिली वेगळीच माहिती



नवी दिल्ली : खरा पंचनामा 

दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी रोख रक्कम आढळून आलेली होती. या प्रकरणात एक मोठी अपडेट पुढे येतेय. अग्निशमन विभागाने कॅश सापडल्याचा दावा फेटाळून लावला आहे. दिल्ली अग्निशमन विभागाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

अग्निशमन विभागाचे अधिकारी गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी रात्री ११.३५ वाजता न्यायाधीश वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. साधारण ११.४३ वाजता कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. एका स्टोअर रुमला आग लागली होती. त्या रुममध्ये स्टेशनरी सामान आणि घरगुती सामान ठेवलेलं होतं. पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली गेली, या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, असं गर्ग यांनी सांगितलं.

न्यूज एजन्सी पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकारी गर्ग म्हणाले की आग विझवल्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आलेली होती. त्यानंतर आमची टीम तिथून रवाना झाली. आग विझवताना आमच्या कर्मचाऱ्यांना कोणतीही कॅश मिळालेली नाही.

दरम्यान, मीडिया रिपोर्टमध्ये कॅश सापडल्यासंदर्भात दावा करण्यात आलेला होता. मोठ्या प्रमाणावर कॅश असल्याचं म्हटलं होतं. याचा संबंध न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीशी जोडण्यात आलेला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने या दोन्ही प्रकरणांचा आपसात संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.