'चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच त्यांचे काम'
पुणे : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच काम महिला आयोगाच्या अध्यक्ष करत असतात, अशी बोचरी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे.
कधीकाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी आपल्या पुण्यनगरीची ओळख होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री पदाचा कारभार गेल्यापासून आपले पुणे शहर हिंसेची राजधानी, दहशतीचे माहेरघर झाले आहे.
पोर्शे कार अपघात, कोयता गँग, दिवसाढवळ्या गोळीबार, चेन चोरी, बलात्कार, विनयभंग, अपघात, खून अशा गुन्ह्यांनी पुणे शहर सतत चर्चेत आहे. लहान लहान मुलांकडे पिस्तूल, कोयता असे हत्यार आढळून येत आहेत. छोट्या मोठ्या कारणांवरून शहरात खून होत आहेत, अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे. या परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे तथा गृहमंत्र्यांचे काहीही नियंत्रण राहिले नाही, असा हल्लाबोल रोहिणी खडसे यांनी केला आहे.
असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात अली यावेळी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे देखील उपस्थित होता. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या वर खडसे यांनी सडकून टीका केली.
रोहिणी खडसे म्हणाल्या, वाढत्या महिला अत्याचारा घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला आयोग कुठेतरी कमी पडत आहे. चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच काम महिला आयोगाच्या अध्यक्ष करत आहे. महिला अत्याचाराबाबत पुण्यामध्ये सातत्याने घटना घडत आहेत. मात्र याबाबत त्यांचा चकार शब्द देखील आलेला नाही.
राज्यातील मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या नावावर महिला अत्याचाराच्या तक्रारी नोंद आहेत. मात्र याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांचा कधीही राजीनामा मागणार नाहीत. त्या फक्त अशा नेत्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत. त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीत फक्त सत्ताधारी पक्षातील नेत्यांची बाजू घेण्यासाठी त्या अध्यक्ष असल्याची टीका खडसे यांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.