ढाब्यावर कारवाई केली मात्र 'माल' पुरवणाऱ्याला अभय?
हद्दीतील गोरख धंद्याबाबत प्रभारी अनभिज्ञ् कसा?
सांगली : खरा पंचनामा
मुख्यालयातील जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या स्कॉडने एका मोठया शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील ढाब्यावर कारवाई केली. त्यावेळी 25 ते 30 हजारांचा 'माल' जप्त करून ढाबा मालकावर कारवाई करण्यात आली. मात्र या ढाब्यावर 'माल' पुरवणाऱ्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याची चर्चा आहे. दरम्यान ज्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली त्या हद्दीतील प्रभारी अधिकारी किंवा त्यांच्या 'झिरो'ला या धंद्याची माहिती नव्हती का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान 'माल' पुरवणाऱ्यावर कारवाई करणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
मुख्यालय असलेल्या शहरातून दुसऱ्या मोठया शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक पॉश ढाबा आहे. विकेंडला येथे खवय्यांची मोठया प्रमाणात गर्दी असते. तेथे ग्राहकांच्या मागणीनुसार 'माल' पुरवला जातो. कोणताही परवाना नसताना माल पुरवला जात असल्याने स्कॉडकडून त्यांना वेळोवेळी इशारा देण्यात आला होता. तरीही ते धंदे न थांबल्याने स्कॉडने काही दिवसापूर्वी कारवाई करून 25 ते 30 हजारांचा माल जप्त करून संबंधितांवर कारवाई केली. यापूर्वी दिलेल्या ईशाऱ्याबाबत 'माल' पुरवणाऱ्याला ढाबा चालकाने माहिती दिली होती. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. शिवाय जिल्ह्यातील सर्वात मोठा पुरवठादार मीच आहे त्यामुळे काळजी करू नको असेही सांगितले.
स्कॉडने मात्र कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली. मग मात्र त्या पुरवठादाराने हात वर करून मी पाहून घेतो असे ढाबा चालकाला सांगितले. पण कारवाई झालीच. आता त्या ढाब्यावर 'माल' पुरवणाऱ्यावर कारवाई होणार की नाही असा प्रश्न आहे.
दरम्यान ज्या हद्दीत हा गोरख धंदा सुरु होता तेथील प्रभारी अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती हे फार मोठे आश्चर्य आहे. शिवाय त्यांच्या 'झिरो'लाही याची कल्पना नव्हती हेही फार मोठे आश्चर्य आहे. 'माल' पुरवठादारावर कारवाई न झाल्यास गुपित उघड होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.