Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अबू आझमींना 100% जेलमध्ये टाकीन! 'नेहरुंबाबत हिंमत आहे का?'

अबू आझमींना 100% जेलमध्ये टाकीन! 
'नेहरुंबाबत हिंमत आहे का?'



मुंबई : खरा पंचनामा 

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यापूर्वी विधानसभा आणि विधानपरिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांना निवड टीका करु नका असं सुनावत थेट माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख करत निशाणा साधला.

अबू आझमींनी केलेल्या विधानावरुन विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षातील आमदारांनी अबू आझमींच्या अटकेची मागणी केली. या विषयावर उत्तर देण्यासाठी उभे राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "सभापती महोदय जेलमध्ये टाकीन. 100 टक्के टाकू," असं अगदी मोठ्या आवाजात सांगितलं.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांच्या बाकावर बसलेल्या आमदारांना उद्देशून, "तुम्ही नीट माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. त्या कोरटकरने न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळवलं आहे. मात्र मी त्याच्यावर जायला सांगितलं आहे. मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोलले त्यावर तुम्ही कधी निषेध केला नाही. जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की, औरंगजेब होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते. औरंगजेब किती बलाढ्या होता. महाराज पाच फुटाचे होते, हे रेकॉर्डवर बोलले. तेव्हा नाही निषेध केला तुम्ही. असा सिलेक्टीव्ह निषेध करु नका. तेव्हा तुम्ही निषेध नाही केला," असं म्हणत सुनावलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.