डिलिव्हरी बॉयने 'सर' न म्हटल्याने ठाणे प्रभारीची भाईगिरी!
शिवीगाळ करत केली बेदम मारहाण
यवतमाळ : खरा पंचनामा
मोबाइलवरून संभाषण करतांना केवळ 'सर' न म्हटल्याच्या कारणावरून एका डिलेव्हरी बॉयला अश्लिल शिवीगाळ करण्यात आली. एवढेच नव्हे तर दमदाटी करीत त्याचा पत्ता विचारण्यात आला. शिवाय तो कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानात जात त्या डिलेव्हरी बॉयला बेदम मारहाण देखील करण्यात आलीय. भाईगिरीलाही लाजवेल असे हे कृत्य यवतमाळ येथील वादग्रस्त ठाणे प्रभारीने केले.
पुढे आलेल्या माहितीनुसार, धिरज गेडाम (रा. आर्णी) असे मारहाण झालेल्या डिलेव्हरी बॉयचे नाव आहे. तो शहरातील सनराईज लॉजिस्टीक कंपनी नामक प्रतिष्ठानात कुरीअर आणि पार्सल पोहोचविण्याचे काम करतो. त्यासाठी त्याला प्रति कुरीअर दहा रुपये मिळकत होते. नेहमीप्रमाणे तो त्याच्या प्रतिष्ठानात बसून ज्यांचे कुरीअर आले आहे, त्यांना कॉल करीत होता. असेच एका कुरीअरवर केशव ठाकरे असे नाव आणि मोबाइल क्रमांक नमूद होता. तेंव्हा त्या मोबाइलवर कॉल करीत धिरजने केशव ठाकरे बोलता का, अशी विचारणा केली. तेंव्हा ठाणे प्रभारी केशव ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. केशव ठाकरे काय तुझा नोकर आहे का, कुणाशी बोलतोय तू तुला माहिती आहे का, मी इथंला ठाणेदार आहे, असे सांगत दमदाटीची भाषा केली.
दरम्यान, त्यावर धिरजने या कुरीअरवर केवळ केशव ठाकरे नाव लिहीले आहे. पद वगैरे काहीच लिहीलेले नाही. त्यामुळे व्हेरीफाय करण्यासाठी हा कॉल केल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा सर, साहेब म्हणण्याची काही पध्दत नाही का, तु कुठे आहे ते सांग, तुलाच व्हेरीफाय करतो, असे म्हणत सज्जड दम दिला.
शिवाय या संभाषणादरम्यान ठाकरे यांनी अश्लिलतेचा कळस असलेली शिव्यांची लाखोळी अनेकदा वापरली. यावरच ते थांबले नाहीते तर चार पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घेऊन थेट त्याच्या प्रतिष्ठानात पोहोचले. तेथेही त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाणही केली. ठाणे प्रभारी ठाकरे हे वादग्रस्त ठरले आहे. त्यानंतर आता डिलेव्हरी बॉयला मारहाणीचे हे त्यांचे कृत्य उघडकीस आल्याने त्यांच्याविरुद्ध जनक्षोभ वाढताच आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.