Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही"

"काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही"



मुंबई : खरा पंचनामा

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभागृहातून बाहेर पडताना लॉबीमध्ये भेट झाली.

आजी - माजी मुख्यमंत्र्यांनी एकमेंकाना नमस्कार केला. त्यासोबतच मिश्किल टोलेबाजी देखील केली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील फडणवीसांच्या मागेच होते. मात्र ठाकरे आणि शिंदे यांनी एकमेकांकडे पाहणेही पसंत केले नाही. दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची नजरानजर देखील झाली नाही. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे सपशेल दुर्लक्ष केले.

अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार सभागृहातून निघाले. त्याचवेळी शिवसेना (ठाकरे) नेते उद्धव ठाकरे सभागृहातून निघाले. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची गाठ पडली. यावेळी त्यांनी एकमेकांना नमस्कार केला. उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले की, काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही. तर, अजित पपवारांना म्हणाले की दादा हा तुमचा अर्थसंकल्प नाही, असे म्हणत अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.

ठाकरे आणि फडणवीस यांची लॉबीमध्ये भेट झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मागेच होते. मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची नजरानजर देखील झाली नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.