"निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण... "
नागपूर : खरा पंचनामा
जो करेगा जात की बात उसको कस के मारुंगा लाथ, असं वक्तव्य मी 50 हजार लोकांमध्ये केलं होतं असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना म्हंटलं आहे. त्यावर मला मित्र म्हणाला होता की असं बोलून तू स्वतःचं नुकसान करून घेतलं आहे.
मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सध्या राज्यात सुरू असलेल्या जातीयवादाच्या मुद्द्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मला अनेक जातीचे लोक भेटायला येतात. एका कार्यक्रमात मी 50 हजार लोकांसमोर 'जो करेगा जात की बात उसको कस के मारुंगा लाथ' असं विधान केलं होतं. त्यावर मला माझ्या मित्रांनी मी असं बोलून चूक केली असल्याचं देखील म्हंटलं होतं. पण मी त्यांना म्हटलं यामुळे मी निवडणूक हरलो, किंवा माझं मंत्रिपद गेलं तरी मला फरक पडत नाही. तरीही मी माझ्या या तत्वावर ठाम राहील, असं यावेळी गडकरी यांनी सांगितलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.