Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? भाजपच्या माजी मंत्र्याच्या प्रश्नामुळे वातावरण तापले

मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? 
भाजपच्या माजी मंत्र्याच्या प्रश्नामुळे वातावरण तापले



मुंबई : खरा पंचनामा 

सध्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड याचे नाव चर्चेत आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यालाही आरोपी करण्यात आलं आहे.

कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या सगळ्या घडामोडी ताज्या असताना भाजप आमदाराने मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण? असा सवाल करत खळबळ उडवून दिली आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला. या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसून ती का मिळत नाही असा प्रश्न भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला होता. आपल्याच सरकारविरोधात त्यांनी धारण केलेले उग्र रूप पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरून ते समाधानी दिसले नाही. त्यांनी टीकेला अधिक धार चढवत आपला मुद्दा आक्रमकपणे मांडणे सुरूच ठेवले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.