Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रशांत कोरटकर फरार; अटकेसाठी कोल्हापूर पोलिस नागपूरकडे

प्रशांत कोरटकर फरार; अटकेसाठी कोल्हापूर पोलिस नागपूरकडे



कोल्हापूर : खरा पंचनामा

अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रशांत कोरटकरने आक्षेपार्ह विधान केले होते. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना प्रशांत कोरकटरने धमकी दिली होती.

याप्रकरणी इंद्रजीत सावंत यांनी कोरटकरच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच कोरटकरने जामीनासाठी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे कोरटकरला केव्हाही अटक होऊ शकते.

प्रशांत कोरटकरच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिस नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. एक अधिकारी आणि ४ कर्मचाऱ्यांचे पथक नागपूरला रवाना झाले आहे. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज भेटल्यानंतर कोल्हापूर पोलिस नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे आता प्रशांत कोरकटरला कधीही अटक होऊ शकते.

प्रशांत कोरटकर अटकेपासून वाचण्यासाठी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार असल्याच्या शक्यतेमुळे पोलिसांच्या वतीने देखील हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे. सकाळी कोर्ट सुरू झाल्यानंतर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.