इस्लामपुरात पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजनेचा शुभारंभ
महिला दिनानिमित्त इस्लामपूर पोलिसांकडून आरोग्य शिबीर उत्साहात
सांगली : खरा पंचनामा
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर पोलीस ठाण्याकडून आरोग्यदायी उपक्रम राबवण्यात आला. इस्लामपूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांच्याहस्ते महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डायलेसिस योजनेचा शुभारंभ करून महाआरोग्य शिबीर घेण्यात आले.
आज शनिवारी इस्लामपूर येथील कोयना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये योजनेचा शुभारंभ करून शिबीर घेण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजने अंतर्गत पोलीस दलातील कुटुंबातील सदस्यांना चांगल्या उपचारांचा लाभ घेता येणार आहे.
यावेळी इस्लामपूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय हारूगडे, डॉ. मुबिन मोमीन, डॉ. सुनील पाटील डॉ. अमित मांढरे, डॉ. कपिल घोरपडे, डॉ. भूषण शिंदे, डॉ. सुशांत पाटील, डॉ. उज्वला शिंदे, डॉ. प्रतिमा मांढरे इत्यादी व हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.