Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एक ट्वीट अन् मुख्यमंत्र्यांनी थेट बस चालकाला केलं निलंबित!

एक ट्वीट अन् मुख्यमंत्र्यांनी थेट बस चालकाला केलं निलंबित!



मुंबई : खरा पंचनामा

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर असून सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार वितरण समारंभ, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशन व प्रदर्शनी, गणेश कला क्रीडा मंच येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


तत्पूर्वी पुणे-दादर शिवनेरी बसने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशाने बसचा चालक गाडी चालवताना सतत फोनवर बोलत असल्याचा एक फोटो सीएमओ या अॉफिशियल एक्स हँन्डवर टॅग केला. यानंतर याची सीएमओने तात्काळ दखल घेतली असून संबंधित चालकाचे निंलबन करण्यात आले आहे. फडणवीस यांच्या या तत्पर कारवाईबाबत त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

आज सकाळी पुण्याहून पुणे ते दादर या शिवनेरी बसने नितीन गोडबोले नावाची व्यक्ती प्रवास करीत होती. या प्रवासादरम्यान बसचा चालक वाहन चालवताना सतत फोनवर बोलत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी चालकाला फोनवरून बोलू नकोस, असे सांगितले. ही बस पुण्याहून दादरच्या दिशेने सकाळी निघाले होती. याविषीयी प्रवासी नितीन गोडबोल यांनी चालकाचा फोनवर बोलत बस चालवण्याचा फोटो काढून तो त्यांच्या एक्सवरून सीएमओ या अॉफिशयन अकाउंटला टॅग केला. या पोस्टमध्ये त्यांनी तक्रार कोठे करायची असा प्रश्न उपस्थित केला.

त्यांच्या या तक्राराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत संबंधित चालकावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.