Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर परीक्षेत्रातील पोलीस ठाण्यानी पुसेगाव ठाण्यासारखे आदर्श कामकाज करावे : फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा फलटणमध्ये भव्य नागरी सत्कार

कोल्हापूर परीक्षेत्रातील पोलीस ठाण्यानी पुसेगाव ठाण्यासारखे आदर्श कामकाज करावे : फुलारी
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा फलटणमध्ये भव्य नागरी सत्कार



फलटण : खरा पंचनामा

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट सेवेच्या मानाने देण्यात आला आहे.

सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने फलटण येथील सजाई गार्डन मंगल कार्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सौ. वैशाली कडुकर, फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे -पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, विलासराव नलवडे, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. जे. टी. पोळ यांच्यासह सातारा जिल्हा पोलीस दलातील विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सत्काराला उत्तर देताना स्पष्ट केले की, पोलीस दलामध्ये नागरिकांशी संवाद साधणे हे महत्वाचे असते. त्यांनी नमूद केले की, "आमच्या अधिकाऱ्यांकडून नेहमीच सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात असतो." ज्या प्रमाणे त्यांना राष्ट्रपदी पदकाने सन्मानित करण्यात आले आहे, त्याच पद्धतीने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस स्टेशनला सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी सर्वच पोलीस स्टेशनने कामकाज करून अव्वल नंबर काढण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या यशाची कथा ही एक प्रेरणादायी उदाहरण आहे. या पोलीस स्टेशनने नागरिकांशी संवाद साधून आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करून एक आदर्श स्थापित केला आहे. या पोलीस स्टेशनने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माध्यमातून मिळालेल्या सन्मानाचा गौरव मिळवला आहे. हे यश संपूर्ण पोलीस दलासाठी एक प्रेरणा आहे, असेही महानिरीक्षक फुलारी यावेळी म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.