"आरोपींना पकडून देण्याचे खरे सूत्रधारही धनंजय मुंडेच"
मुंबई : खरा पंचनामा
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पकडून देण्याचे खरे सूत्रधार धनंजय मुंडेच आहेत, असा मोठा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्यासह दहा आरोपींना सहआरोपी करावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यासंदर्भातील आरोप केले. अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चानाही उधाण आलं आहे.
"संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी बालाजी तांदळेची मदत घेण्यात आली होती. आरोपींचा शोध घेण्यासाठी त्याला पोलिसांसोबर फिरवण्यात आलं होतं. त्यासाठी धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर दबाव आणला होता. कारण हे प्रकरण जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावर शेकायला लागलं तेव्हा हे पोलीस कराड किंवा आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी इतर आरोपींना अटक करून हे प्रकरणत तिथल्या तिथे निपटवावं, असा धनंजय मुंडेंचा प्रयत्न होता", असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
"बालाजी तांदळे हा पहिल्या दिवसांपासून पोलिसांबरोबर फिरत होता. मात्र, त्याला पोलिसांचं लेटर १५ डिसेंबर रोजी देण्यात आलं. याप्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या मित्रालाच सोबत घेऊन फिरवलं. त्यासाठी धनंजय मुंडे यांनी दबाव आणला होता. इतकचं नाही तर बालाजी तांदळेंनी स्वतःला देशमुख कुटुंबाला सांगितलं की या आरोपींना पोलिसांनी नाही तर आम्ही पकडलं. त्यामुळे आरोपींना पकडून देण्याचे खरे सूत्रधारही धनंजय मुंडेच आहेत, असेही त्या म्हणाल्या.
"या प्रकरणात ज्या पोलिसांनी आरोपींना मदत केली, त्यांची कुणाचीही नावं आरोपपत्रात नाही. त्यांचे जबाबही या आरोपपत्रात नाही. राजेश पाटील, राजेश महाजन, एसलीबीचे अधिकारी गीते यांनी आरोपींना मदत केली होती. संतोष देशमुख यांना उचलून नेलं याची कल्पना गीते यांना होती. मात्र, तरीही त्यांनी या टोळीला मदत केली", असंही दमानिया यांनी सांगितलं.
"त्यामुळे धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे आणि त्याची पत्नी, एस.पी. बारळग, पीएसआय पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार, एलसीबीचे अधिकारी गीत अशा दहा जणांना सहआरोपी करण्यात यावं", अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली.
"मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं की जेव्हा आम्हाला धनंजय मुंडे यांच्याबद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन मिळेल, तेव्हा आम्ही त्यांच्यावरदेखील कारवाई करू. पण आत्ताच्या घटकेला इन्फॉर्मेशन मिळालेली नाही, असं जे मुख्यमंत्री म्हणाले तर त्याच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आमच्याकडे काही माहिती आहे, त्यानुसार आरोपींना पळून गेल्यानंतर शोधून देण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मुंडे हेच होते, त्यामुळे त्यांना सहआरोपी करावं", असेही त्या म्हणाल्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.