कोल्हापुरातील 69, सांगलीतील 50, साताऱ्यातील 26 देशी दारू दुकाने, बियर शॉपी, बियर बार बंद!
महसूल वाढीत सातारा प्रथम, सांगली द्वितीय, कोल्हापूर तृतीय
सांगली : खरा पंचनामा
बार चालकांवर लादलेला १० टक्के व्हॅट आणि वार्षिक शुल्कात १५ टक्क्यांची वाढ यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 69, सांगली जिल्ह्यातील 50 तर सातारा जिल्ह्यातील 26 देशी दारू दुकाने, बियर शॉपी, बियर बार बंद पडले आहेत. या तीन जिल्ह्यातील महसूल वाढीमध्ये सातारा जिल्ह्याने 8.7 टक्के वाढ करत पहिला, सांगली जिल्ह्याने 5.5 टक्के वाढ करत दुसरा तर कोल्हापूर जिल्ह्याने 1.5 टक्के वाढ तिसरा क्रमांक मिळवला आहे. एकंदरीत सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण एक हजार 235 कोटी रुपये इतका महसूल राज्य शासनाला दिला आहे.
सातारा जिल्ह्यात 2023-24 या आर्थिक वर्षात 138.94 कोटी इतका महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोळा केला होता. 2024-25 या आर्थिक वर्षात 150.94 कोटी इतका महसूल गोळा केला आहे. जिल्ह्याच्या महसूलात 8.7 टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 1 बियर शॉपी आणि 25 बियर बार चालकांनी परवाना नूतनिकरण शुल्क नाही भरल्याने 1 एप्रिलपासून 26 परवाने बंद असल्याची माहिती सातारा राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना दिली.
सांगली जिल्ह्यात 2023-24 या आर्थिक वर्षात 412 कोटी इतका महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोळा केला होता. 2024-25 या आर्थिक वर्षात 435 कोटी इतका महसूल गोळा केला आहे. जिल्ह्याच्या महसूलात 5.5 टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 3 देशी दारू दुकाने, 9 बियर शॉपी आणि 38 बियर बार चालकांनी परवाना नूतनिकरण शुल्क नाही भरल्याने 1 एप्रिलपासून 50 परवाने बंद असल्याची माहिती सातारा राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात 2023-24 या आर्थिक वर्षात 639 कोटी इतका महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोळा केला होता. 2024-25 या आर्थिक वर्षात 649 कोटी इतका महसूल गोळा केला आहे. जिल्ह्याच्या महसूलात 1.5 टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 5 देशी दारू दुकाने, 16 बियर शॉपी आणि 48 बियर बार चालकांनी परवाना नूतनिकरण शुल्क नाही भरल्याने 1 एप्रिलपासून 69 परवाने बंद आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.