Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता धावत्या रेल्वेत काढता येणार पैसेपंचवटी एक्स्प्रेसमध्ये ATM ची सोय

आता धावत्या रेल्वेत काढता येणार पैसे
पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ATM ची सोय

मुंबई : खरा पंचनामा

धावत्या ट्रेनमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध करण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सुविधा उपलब्ध झाली असूनअशा प्रकारची सुविधा असलेली ही पहिलीच एक्सप्रेस आहे.

त्यामुळे आता प्रवासादरम्यानही प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची सोय होणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच रेल्वेच्या महसुलात देखील वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

रेल्वे गाड्यांमध्ये एटीएम बसवण्याचा विचार प्रथम भुसावळ विभागाने आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत मांडण्यात आला होता. या कल्पनेला प्रतिसाद देत, बँक ऑफ महाराष्ट्रने "नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना" (NINFRIS) अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला होता. सध्या गाडी क्रमांक 12110 मनमाड-मुंबई सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावते. एकूण 22 डब्यांच्या या गाडीची आसन क्षमता 2032 असून दररोज सुमारे 2200 प्रवासी दररोज प्रवास करतात. संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभघेता येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून एक खास कोच तयार करण्यात आला आहे. यामध्ये एटीएम बसवण्यात आले असून, हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही एटीएम सेवा असलेली ट्रेन मुंबईत दाखल झाली. हे एटीएम 'एक्स्प्रेस' सेवेच्या एसी चेअर कार कोचमध्ये बसवण्यात आले असून, लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. चालत्या ट्रेनमध्ये एटीएम सुरळीतपणे कार्यरत राहावे यासाठी योग्य विद्युत प्रणाली आणि संरचनात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हा संपूर्ण उपक्रम योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवला जात आहे. या ऑनबोर्ड एटीएम सेवेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान सहज आर्थिक व्यवहार करता येणार असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.