Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेतील त्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकललेसदोष मनुष्यवध प्रकरणी एकाला अटक : एलसीबीची कारवाई

मिरजेतील त्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलले
सदोष मनुष्यवध प्रकरणी एकाला अटक : एलसीबीची कारवाई

सांगली : खरा पंचनामा

मिरज येथे उत्तम नगर मध्ये झालेला तरुणाच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात यश आले आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

तुषार सिद्धार्थ सुंटनुर ( वय 24,रा. पंढरपूर चाळ, मिरज ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मिरज येथील उत्तमनगरमधील रेल्वे रुळानजीक दि. १४ एप्रिल रोजी सचिन सदाशिव कोळी ( वय 23, रा. कर्मवीर नगर, म्हैसाळ ता. मिरज ) हा तरुण जखमी अवस्थेत आढळला होता. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर डोक्याला दगड लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. 

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक तयार केले होते. या पथकातील अतुल माने आणि रत्नजित जाधव यांना त्यादिवशी मयत सचिन कोळी आणि संशयित तुषार सुंटनूर यांच्यात वाद झाल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तुषार सुंटनूर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घटनाक्रम सांगितला. त्यादिवशी रेल्वे रुळानजीक एकजण लहान मुलांना शिवीगाळ करत होता. त्याबद्दल तुषारने त्याला जाब विचारला. यातून तुषार आणि मयत सचिन यांच्यात वाद झाला. मारामारी झाली. या वादातूनच तुषार याने सचिनच्या तोंडावर, नाकावर ठोसे मारून त्याला ढकलून देऊन तो निघून गेला. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या उतारावरून सचिन घसरत गेला. त्यावेळी त्याचे डोके दगडावर आदळून तो जखमी झाल्याची माहिती ऊघडकीस आली. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात संशयित तुषार सुंटनूर याच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर, सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत, अनिल ऐनापुरे, अतुल माने, सूर्यकांत साळुंखे, आमसिदा खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.