पहलगाम हल्ल्यात चीनचा सहभाग...?
तपासात धक्कादायक माहिती उघड
दिल्ली : खरा पंचनामा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील गुप्तचर यंत्रणांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून या घटनेचा तपास केला जात आहे. या प्रकरणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेच्या तपासांतर्गत तपास यंत्रणांना चीनच्या एका संशयास्पद सॅटेलाईट फोनचा मागोवा लागला आहे. तपास यंत्रणांना चीनच्या एका 'हुआवेई सॅटेलाइट फोन'चा तपास लागला आहे. पहलगाम हल्ल्यावेळी हा फोन घटनास्थळावर होता, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुआवेई ही चीन कंपनी आहे. या कंपनीच्या उपग्रह उत्पादनावर भारतात बंदीही घालण्यात आली आहे. घटनेवेळी हा फोन पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही परदेशी स्त्रोताच्या माध्यमातून भारतात आल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे. २२ एप्रिलला ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी या फोनवरून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी चार वेळा संपर्क साधण्यात आला होता. पण घटनास्थळी मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असल्याने हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला नाही. हल्ल्यापूर्वी आणि त्यादरम्यान किमान १० लोक एन्क्रिप्टेड अॅप्सद्वारे त्यांच्या हँडलरशी गप्पा मारत होते आणि त्यांना कॉल करत होते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएने हाती घेतला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएचे पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या देखरेखीखाली स्थापन केलेल्या पथकाकडून सुरू आहे. अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळावर दाखल होणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या मार्गांवर कसून तपास केला जात आहे. काश्मीरमधील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एकाला कारणीभूत ठरलेल्या घटनांचा क्रम निश्चित करण्यासाठी प्रत्यक्षदर्शीची सखोल चौकशी केली जात आहे. यासोबतच फॉरेन्सिक आणि इतर तज्ञांच्या मदतीने, संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करत आहेत आणि पुरावे गोळा करत आहेत.
विशेषज्ञांच्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना आता अशा संप्रेषण साधनांचा वापर करत आहेत, जे सैनिकी दर्जाच्या एन्क्रिप्शनने सुसज्ज आहेत. यात एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, क्वांटम-प्रतिरोधक अल्गोरिदम आणि स्टेग्नोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे उपकरणे अतिशय वेगाने रेडिओ फ्रीक्वेन्सी बदलतात, ज्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण होते. तसेच, सॅटेलाइट फोन स्थानिक नेटवर्कला वगळून थेट जागतिक संप्रेषण यंत्रणेशी जोडलेले असतात, त्यामुळे त्यांचा माग काढणे अधिक कठीण बनते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.