निलंबित पीएसआय रणजित कासलेंना आणखी एक दणका
बीड : खरा पंचनामा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात चर्चेत आला आहे. वल्मिक कराड याच्या एन्काऊंटरची ऑफर देण्याती आली होती असा धक्कादायक दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वल्मिक कराड राज्याचे माजी मंत्री धनजंय मुंडे यांचा निकटवर्तीय असुन संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात आहे. वल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी मला 50 कोटी रुपयांची ऑफर होती असा दावा रणजीत कासले यांनी केला आहे. तर आता या दाव्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक नवनीत कावत म्हणाले की, रणजीत कासले एक निलंबीत अधिकारी असून त्याची चौकशी सुरु आहे. रणजीत कासले यांनी काही अपशब्द वापरले असून ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आम्ही त्या प्रकरणात त्यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल केला असून त्याचा देखील तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
रणजित कासले याने जातीय वक्तव्य करून भावना दुखावल्या प्रकरणी बीडमधील एका वकिलाच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी बीड पोलीस सायबर विभागात पोलीस निरीक्षक म्हणून काम केलं आहे मात्र त्यांना काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी निलंबित केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.