Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुरस्कार प्राप्त पोलिस निरीक्षकाविरोधात गुन्हा

पुरस्कार प्राप्त पोलिस निरीक्षकाविरोधात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी आदल्या दिवशी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर दुसऱ्या दिवशीच पोलिस निरीक्षकाविरोधात कारवाई करत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या महिला शिपायाने या पोलिस निरीक्षकावर आक्षेपार्ह मेसेज आणि फोटो पाठवल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसाविरोधात कारवाई करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्कृष्ट सेवेसाठी सोमवारी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले. हा पुरस्कार मिळताच दुसऱ्या दिवशी पोलिस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिला शिपायाने व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मेसेज आणि फोटो पाठवल्याबाबत तक्रार केली होती. या प्रकरणी भंडारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक भंडारे यांनी हे मेसेज ९ एप्रिल रोजी रात्री पाठवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र हा गुन्हा द्वेषभावना आणि गैरसमजातून झाला, असे भंडारे यांचे म्हणणे आहे. पोलिस मुख्यालयात ३४ वर्षांच्या फिर्यादी शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ एप्रिल रोजी रात्री घरी असताना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एका नंबरवरून कॉल आला. परंतु, त्या आईसोबत बोलत असल्याने त्यांनी कॉल घेतला नाही.

नंबर सेव्ह नसल्याने त्यांनी 'कौन?' असा मेसेज पाठवला. त्यावर अधिकाऱ्याने स्वतःचा फोटो पाठवला आणि लगेच डिलीट केला. त्यावर त्यांनी पुन्हा 'कौन?' अशी विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्याने आक्षेपार्ह मेसेज पाठवला. महिला पोलिसाला अशोक भंडारे यांनीच मला हे आक्षेपार्ह मेसेज आणि फोटो पाठवल्याचे लक्षात येता त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी मंगळवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.