सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 'माझ्या गावचा धडा’ पुस्तक प्रदर्शनाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
सांगली : खरा पंचनामा
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. दरम्यान सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज 'माझ्या गावचा धडा’ पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, गाव म्हटलं की प्रत्येकाला आठवणींमध्ये रमून जायला होतं. गाव म्हणजे मातीतल्या माणसांचा जथ्था, जो दुःखाचे अवडंबर करत नाही; अन् सुखाचे बाजार भरवत नाही. देवळातल्या मुक्या खांबातही गावाची कहाणी ऐकायला येते. गावच्या या कहाण्यांमधून मुलांना प्रेरणा मिळावी, यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 'माझ्या गावचा धडा’ पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गावच्या या कहाण्यांमधून मुलांना प्रेरणा मिळावी, यासाठी या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यातील गावांचा लिखित सांस्कृतिक दस्तऐवज बनण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या मनात गावाबद्दल, गावच्या मातीबद्दल श्रद्धा अधिक दृढ होईल, असा विश्वास यानिमित्त पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.