संतोष देशमुख हत्या प्रकरण : एसआयटी पथकात बदल, आणखी दोघांचा समावेश
बीड : खरा पंचनामा
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निघुण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तर या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या चार महिन्यांपासून फरार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाकरिता एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणातील दोषारोपपत्र देखील दाखल झाले असताना शासन निर्णयानुसार एसआयटी पथकात दोन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार राजू वंजारे आणि पोलीस नाईक अनिल मंदे यांचा आता एसआयटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून त्याला अटक करण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांची मदत होऊ शकते. यामुळेच यांचा समावेश झाला कर्मचाऱ्यांची मदत होऊ शकते. यामुळेच यांचा समावेश झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये आतापर्यंत झालेला हा तिसरा बदल आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांचे चार महिन्यांपूर्वी अपहरण करून निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. या प्रकरणाची सुनावणी दि. 10 एप्रिल रोजी विशेष मकोका न्यायालयात न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्या समोर सुनावणी झाली होती. याप्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.