Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जामीन मिळाला, पण कोरटकर तुरुंगातच राहणार?

जामीन मिळाला, पण कोरटकर तुरुंगातच राहणार?

कोल्हापूर : खरा पंचनामा

छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर दिलासा मिळाला आहे.

न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या कोरटकरचा कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 13 मार्चला न्यायालयीन कोठडी संपत असताना कोरटकरला आज न्यायालयाकडून अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 7 एप्रिल रोजी झालेल्या दोन्ही बाजूचा युक्तिवादानंतर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

25 फेब्रुवारी रोजी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी कोरटकरने दिली होती. या संभाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल अवमानास्पद वक्तव्यही केलं होतं. यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पण पोलिसांच्या हातावर तुरी देत तो महिनाभर फरार होता. त्याला 25 मार्च रोजी तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथून अटक करण्यात आली होती. तर न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर देखील तपासासाठी पोलिसांनी 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण कोरटकरला 13 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती.

यावेळी सरकारी वकील असीम सरोदे यांनी, कोरटकरला खूप उशिरा जामीन मंजूर झालेला आहे. अशा प्रकरणात अनेकांना खूप लवकर जामीन मंजूर होतो. मात्र त्याला जामीन मिळू नये यासाठी आम्ही लढा दिला. त्याच्या जीवाला बाहेर धोका आहे, असा युक्तिवाद आम्ही केला होता. मात्र अटी व शर्तीवर त्याला जामीन मंजूर झाला आहे. कोरटकरला पन्नास हजार रुपयांचा जात मुचलका, तपासासाठी ज्या ज्या वेळी पोलीस बोलावतील त्या त्यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर राहणे, फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवायचं नाही अशा या प्रमुख तीन अटींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.