Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला अधिकाऱ्याशी संबंधांचा आरोप जिव्हारीमंत्री महाजनांनी खडसेंना खेचलं थेट कोर्टात

महिला अधिकाऱ्याशी संबंधांचा आरोप जिव्हारी
मंत्री महाजनांनी खडसेंना खेचलं थेट कोर्टात

जळगाव : खरा पंचनामा

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातलं राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहेत.

एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोघेही नेते सोडत नाही. पण काही दिवसांपूर्वी आमदार खडसेंनी गिरीश महाजनांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यावर महाजनांनी आता कठोर पाऊल उचललं असून थेट आमदार एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे.

मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी (ता.14) मीडियाशी संवाद साधतानाच एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी एकनाथ खडसेंना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे खडसेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

महाजन म्हणाले, कुणीही यावं आपल्यावर काहीही आरोप करावेत हे आपण आता सहन करणार नाही. यामुळे समाजातल्या आपली प्रतिमा मलीन होते. त्यामुळेच आपण आता मुंबईतील वकिलांमार्फत एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना आपण अब्रु नुकसानीची नोटीस पाठवल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच या लोकांविरोधात आता आपण कोर्टातच लढणार असल्याचं स्पष्ट भूमिकाही खडसेंनी यावेळी मांडली आहे.

एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असा दावा खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे भाजपसह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, या आरोपांवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसेंनी एक पुरावा द्यावा, मी राजकारण सोडेन, असं खुलं आव्हानही महाजन यांनी खडसेंना दिलं होता. मी सोडेन, असं खुलं आव्हानही महाजन यांनी खडसेंना दिलं होता. मी एकनाथ खडसे यांची एक गोष्ट सांगितली तर ते बाहेर निघाले तरी लोक त्यांना जोड्याने मारतील असा तिखट पलटवारही केला होता.

तसेच मी अजूनही त्यांना आव्हान देतो. त्यांनी फक्त एक पुरावा दाखवावा, मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडतो. मी कधीच कोणाला तोंड दाखवणार नाही. त्यांनी पुवावे लोकांना दाखवावेत. त्यांनी नुसतं बडबड करू नये. यांना पुरावे दिले, त्याला पुरावे दिले, असे करू नये, असंही चॅलेंज भाजप नेते महाजन यांनी खडसे यांना दिले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.