शिरोळ ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक निलंबित
तीन विवाह केल्याने पहिल्या पत्नीच्या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षकांची कारवाई
जयसिंगपूर : खरा पंचनामा
पहिल्या पत्नीला फसवून आणखी दोन विवाह करणार्या शिरोळ पोलिस ठाण्याकडील पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. पहिल्या पत्नीने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्या उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या वृत्ताला शिरोळचे प्रभारी पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दुजोरा दिला.
इम्रान बाबाजी मुल्ला (वय 40, मूळ रा. रेठरे बुद्रुक, ता.कराड, जि.सातारा) असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. उपनिरीक्षक मुल्ला यांचा आफरीन मुल्ला यांच्याशी 2019 मध्ये विवाह झाला होता. गोंदिया येथे सेवा बजावत असताना (चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील आफरीन यांच्यासोबत मुल्ला यांचा सातत्याने वाद होत होता. यावेळी गोंदियातील केशारी पोलिस ठाण्यात आफरीन यांनी शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यावेळीही इम्रान मुल्ला यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.
दरम्यान 23 जून 2024 रोजी उपनिरीक्षक मुल्ला यांनी तिसरे लग्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर कराड पोलिस ठाण्यात आफरीन मुल्ला यांनी तक्रार दिली होती. कारवाई होत नसल्याने माहिती अधिकारात अर्ज देऊन त्यांनी पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. इम्रान मुला यांनी आतापर्यंत तीनवेळा लग्न केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाल्यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.