Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सरकारी योजनेच्या पैशांसाठी पुरुषांनी नेसली साडी!

सरकारी योजनेच्या पैशांसाठी पुरुषांनी नेसली साडी!

बंगळूरू : खरा पंचनामा

सरकारी योजनेचे पैसे लाटण्यासाठी पुरुषांनी चक्क साडी नेसून फोटो काढल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्नाटकात ही घटना घडली असून काही पुरुष साडी नेसून मनरेगाच्या मजुरांसोबत उभा राहिले. त्यांनी फोटो काढून ते नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टिमवर अपलोड केले. मनरेगा अंतर्गत महिला मजूर काम करत असल्याचं दाखवण्यासाटी हा सगळा प्रकार केला जात होता.

अधिकाऱ्यांना याबाबत शंका येताच अधिकाऱ्यांनी थेट मनरेगाच्या साइटवर भेट दिली. तेव्हा तिथं काही पुरुष साडी नेसून उभा होते. त्यांनी चेहरे झाकले होते. अधिकाऱ्यांनी चेहऱ्यांवरचा पदर हटवायला सांगताच पुरुषांचे चेहरे समोर आले. त्यांनी महिलांसारखा वेष करून सरकारच्या योजनेतून ३ लाख रुपये लाटले.

फेब्रुवारी २०२५ मध्ये हा प्रकार समोर आला. यामुळे सरकारी योजनेचे पैसे चुकीची माहिती देऊन घेतले. त्यांच्यामुळे प्रत्यक्षात कामाच्या शोधात असलेल्या महिला मजुरांना मात्र काम मिळू शकलं नाही. जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा स्थानिक लोकांनी प्रशासनाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, स्थानिक पंचायतीने आम्ही निर्दोष असून सगळा दोष हा बाहेरून बोलावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा असल्याचा दावा केलाय.

मल्हार गावचे पंचायत विकास अधिकारी चेन्नबसवा यांनी सांगितलं की, या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाहीय. एका बाहेरून बोलावलेल्या कर्मचाऱ्यानेच हे सगळं केलं आणि मला याची माहिती नव्हती. जेव्हा प्रकरण समोर आलं तेव्हा त्या कर्मचाऱ्याला निलंबित केलंय. आता मनरेगा योजनेंतर्गत काम सुरू आहे. आम्ही अडीच हजार कामगारांना काम दिलंय.

ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाने दावा केला की, मार्चपासून मनरेगा योजनेंतर्गत १०० दिवस रोजगार देण्याची योजना होता. यामुळे मजुर मोठ्या शहराकडे जाणार नाहीत. मजुरांना काम मिळावं त्यांना मदत व्हावी यासाठी डिमांड सेंटर्स उघडली आहेत. ज्यांना कामाची गरज असते त्यांना मदत केली जाते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.