'महायुती' सरकारविरोधात 'लाडक्या बहिणी' पोलिस ठाण्यात!
श्रीरामपूर : खरा पंचनामा
महायुती सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची' जुलै महिन्यात घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याल 1500 रुपये जमा होतात. तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हप्ता 2100 करू असं आश्वासनं महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दिलं होतं.
आता राज्यात महायुती सरकार आलं असून, शंभर दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरी देखील लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाढवलेलं नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या असून महायुती सरकारच्या विरोधात अहिल्यानगरमधील श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.
महायुती सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात शेतकरी महिलांनी तक्रार दिली आहे. तसेच गुन्हा नोंदवण्याची मागणी शेतकरी महिला सुनिता वानखेडे, कोमल वानखेडे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, श्रीरामपूर पोलिसांनी शेतकरी महिलांचा तक्रारी अर्ज दाखल करून घेतला असून, पुढं काय कारवाई होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होते की, सरकार येताच माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये दर महिना अनुदान देऊ, पणं निवडून सत्तेत येताच महायुतीने 2100 रुपये तर नाहीच दिले. पणं किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे 1500 रुपये अनुदानही बंद केले.
आता फक्त 500 रुपये प्रति महिना देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच, लाडक्या बहिणींना 2100 रुपये पणं नाही, अन् 1500 रुपये पणं नाही. आता 500 रुपये देऊन आमची फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरुद्ध श्रीरामपूर पोलिस ठाण्यात केली आहे. दरम्यान, श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शेतकरी संघटना नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि लाडक्या बहिणी 5 मे रोजी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.