पोलीस ठाण्याच्या कलेक्शन वरून भिडले पोलीस कर्मचारी!
नाशिक : खरा पंचनामा
शहरातील सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये वादग्रस्त पोलीस कर्मचारी रजपूत आणि गोपनीय शाखेतील पोलीस कर्मचारी पाटील यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बाबत पोलीस आयुक्त कर्णिक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
नाशिक शहरामध्ये मागील काही दिवसापासून सातत्याने गुंडगिरी ही वाढलेली आहे. त्यामुळे नागरिक पहिल्यापासूनच धास्तावलेले आहेत. महिलांच्या गळ्यातील सोन सकाळी तुरीचे तर घटना नेहमीच सुरू आहे पण दुसरीकडे मात्र आता नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे हे कमी होते की काय आता शहरातील पोलीस ठाण्यामध्येच कलेक्टर म्हणून भूमिका निभावणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्यांना सर्रासपणे मारहाण करण्यापर्यंतचे प्रकार सुरू झाले आहेत.
असाच प्रकार सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत वादग्रस्त राहिलेले रजपूत या कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यामध्ये गोपनीयतेचे काम करणाऱ्या पाटील या कर्मचाऱ्यांबरोबर दुपारी सर्वसाधारण साडेतीन वाजेच्या सुमारास शाब्दिक चकमक उडाली आणि या दोघांमध्ये शब्दाने शब्द वाढत गेला. त्यानंतर हे दोघेही पोलीस ठाण्यातच एकमेकांवर धावून गेले आणि दोघे भिडल्यानंतर त्यांना बाजूला करण्यासाठी अन्य कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. परंतु या दोघांनी एकमेकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कपडे फाडले घटनेची माहिती मिळतात तातडीने प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत कान उघडणे केली. परंतु त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही आणि दोघेही एकमेकाला वरिष्ठांसमोरच बोलू लागले. अखेर या दोघांनाही पोलिसांनी घरी पाठवून दिले. त्यामुळे हा वाद मिटला. पण मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यांमधील कलेक्टरच्या वर्चस्वावरूनच हे दोघे एकमेकाला भिडले असल्याची माहिती मिळत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.