पोलिसांची चिंधीचोरी; विक्रेत्याचे ५६ बेडशीट पळवले, परत देण्यासाठी दोघांनी मागितले इतके...
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील विमानतळावर पोलिसांची चिंधीचोरी चव्हाट्यावर आलीय. विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या विमान नगर परिसरातील दत्त मंदिराजवळ बेडशीट विकणाऱ्या बेडशीट विक्रेत्याचे ५६ बेडशीट दोघा पोलिसांनी पळवले. पळवलेले बेडशीट परत देण्यासाठी दोघा पोलिसांनी १४ हजार रुपये बेडशीट विक्रेत्याकडून घेतले. परंतु ५६ बेडशीट परत न करत दोघांनी केवळ ३७ बेडशीटच विक्रेत्याला परत केले.
दोघा पोलीस शिपायांनी चिंधीगीरी करत बेडशीट विक्रेत्याचे बेडशीट पळवल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलीस रस्त्यावर चिरीमिरी घेत असल्यास आपण अनेकवेळा पाहिलंय. परंतु पोलीस स्टेशनच्या खाकी वर्दीतील या दोघा पोलीस शिपायांनी थेट चिंधीचोरपणा करत एका गरीब बेडशीट विक्रेत्याकडून बेडशीट पळवल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस दलातील पोलीस शिपायांना चांगला पगार असून, हा पगार या पोलिसांना पुरत नाही का? या दोघंही पोलीस शिपायांनी थेट बेडशीट विक्रेत्याला हप्त्यासाठी त्यांचे बेडशीट पळविण्याच्या घटनेमुळे पुण्यात एकच चर्चा रंगली आहे.
पोलीस दलातील पोलीस शिपाई अशा पद्धतीने चिंधीचोरी करत बेडशीट पळवणाऱ्या धक्कादायक प्रकाराकडे गृहविभाग लक्ष देणार का? हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दोन्ही चिंधीचोर पोलिसांची पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असून या दोघाही चिंधीचोर बेडशीट पळवणाऱ्या पोलीस शिपायांची पगारवाढ आता पोलीस खात्याने रोखून धरली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.