मुंबई पोलीस आयुक्तपदी 'लेडी सुपरकॉप' अर्चना त्यागी ?
विवेक फणसळकर होणार आज होणार निवृत्त
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे उद्या बुधवार (दिनांक ३० एप्रिल २०२५) रोजी पोलीस दलातून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी रस्सीखेच सुरू आहे.
मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी, सदानंद दाते, संजय वर्मा, देवेन भारती यांच्या नावाची जोरदार चर्चा पोलीस दलात सुरू आहे, मात्र राज्य सरकारकडून मुंबई पोलीस आयुक्तपदी महिला अधिकारी बसविण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अर्चना त्यागी यांना मुंबई आयुक्तपदी निवड झाल्यास मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्या महिला पोलीस आयुक्त त्यागी असतील.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे बुधवारी ३० एप्रिल २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या सेवा निवृत्तीला काही तास उरलेले असतांना राज्य सरकारकडून कुठल्याही क्षणी नवीन पोलीस आयुक्तांच्या नावाची घोषणा केली जाईल असे सूत्रांनी सांगितले आहे. मुंबई पोलीस आयुक्त हे पद राज्य पोलीस दलात सर्वात महत्वाचे आणि मानाचे मानले जाते. प्रत्येक आयपीएस अधिकाऱ्यांचे मुंबईचे पोलीस आयुक्तपदी विराज मान होण्याचे स्वप्न असतात.
हे पद भूषविण्यासाठी ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यामध्ये रस्सीखेच सुरू असते. ३० एप्रिल रोजी रिक्त होणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी जेष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते, अर्चना त्यागी, संजय वर्मा आणि देवेन भारती यांच्या नावाची चर्चा गेल्या काही आठवड्यापासून सुरू होती. परंतु २६/११ मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर एनआयए चे प्रमुख सदानंद दाते यांचे नाव मुंबई आयुक्त पदासाठी आघाडीवर होते. परंतु दाते हे या पदासाठी इच्छुक नसल्याचे कळते. दरम्यान मागील आठवड्यापासून आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असून मुंबई महानगर पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका महिलेला मुंबई पोलीस आयुक्त पदावर बसवून संपूर्ण महिला वर्गाचा सन्मान करण्याचा सरकारचा मनसुबा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी तसेच मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त यांना आहे त्याच पदावर बसवून त्यांच्यावर काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. १९९३ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी सध्या महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात. 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यागी त्यांच्या प्रतिष्ठित कारकिर्दीसाठी प्रसिद्ध आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.