मिरजेत बियरची अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक
इनोव्हा कारसह 10.32 लाखांचा माल जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
इनोव्हासारख्या आलिशान कारमधून विविध कंपन्यांच्या बियरची वाहतूक करणाऱ्या हरिपूर (ता. मिरज) येथील एकाला अटक करण्यात आली. मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. यावेळी कारसह बियरचे बॉक्स असा 10.32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
दीपक आकाराम पिंगळे (वय 36, रा. बाजार गल्ली, हरिपूर, ता. मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलिसांची कसून तपासणी सुरु आहे शिवाय गस्तही सुरु आहे. काल रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी एक इनोव्हा कारचा (एम एच 10 सी क्यू 9199) पोलिसांना संशय आला. ती गाडी थांबवून तिची तपासणी केल्यावर त्यामध्ये विविध कंपन्यांच्या बियरचे भरलेले बॉक्स सापडले. त्याच्या वाहतूक परवान्याबाबत पिंगळे स्पष्टीकरण देऊ शकला नाही. त्यानंतर त्याला अटक करून कारसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, नाना चंदनशिवे, सिद्धेश्वर पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.