Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस उपनिरीक्षकावर अॅट्रोसिटीचा गुन्हा ! रजिस्टर लग्न करून घरी न सांगता तरुणीशी शारीरीक संबंध ठेवून उकळले 12 लाख

पोलीस उपनिरीक्षकावर अॅट्रोसिटीचा गुन्हा ! 
रजिस्टर लग्न करून घरी न सांगता तरुणीशी शारीरीक संबंध ठेवून उकळले 12 लाख

पुणे : खरा पंचनामा

प्रेमसंबंधांतून त्यांनी गुपचुप नोंदणी पद्धतीने विवाह केला. परंतु, या लग्नाचे तरुणाने घरी सांगितले नाही. वेळोवेळी १० ते १२ लाख रुपये तिच्याकडून उकळले. तिच्या घरी शारीरीक संबंध ठेवले. पीएसआयपदी निवड झाल्यानंतर लग्नाबाबत घरी सांगण्यास नकार देऊन तरुणाने तिला जातीवाचक शिवीगाळ केली.

तिच्यावर बलात्कार करुन गर्भपात करायला भाग पाडले. अशा नव्याने पोलीस उपनिरीक्षक झालेल्या नराधमाबरोबर त्याचा भाऊ आणि वडिलांवर विश्रामबाग पोलिसांनी अॅट्रोसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

विराज गावडे (वय ३२, रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) आणि त्याचा भाऊ कुणाल गावडे व वडिल गजानन गावडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० सप्टेंबर २०२० ते आतापर्यंत झाला आहे.

आरोपी विराज गावडे हा पुण्यात असताना त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. परंतु, या विवाहाबद्दल त्याने आपल्या घरी, मित्र परिवार व समाजात पत्नी म्हणून फिर्यादीची कधीही ओळख करुन दिली नाही. लग्नाबद्दल घरी सांगेल असा विश्वास दाखवून त्याने फिर्यादीकडून वेळोवेळी १० ते १२ लाख रुपये घेतले. फिर्यादीच्या घरी शारीरीक संबंध ठेवले. विराज गावडे याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यास फिर्यादी हे घरी तसेच नातेवाईकांना त्यांच्या लग्नाबद्दल सांगण्याबाबत फिर्यादी बोलल्या. तेव्हा त्याने फिर्यादी यांची घरच्यांशी ओळख करुन देण्यास व त्यांच्या लग्नाबद्दल घरी सांगण्यास टाळाटाळ केली.

तू खालच्या जातीची आहे, माझ्या घरचे तुझा स्वीकार करणार नाहीत. त्यांना आपले लग्न मान्य होणार नाही, तु माझा विचार विचार सोडुन दे," असे म्हणून फिर्यादीपासून दूर राहु लागला. तसेच केवळ त्याच्यावर बलात्कार व गर्भपात असे गुन्हे दाखल होण्याचे टाळण्यासाठी पूर्व नियोजित करुन फिर्यादी यांची शारीरीक व मानसिक, व आर्थिक फसवणूक केली. त्यात त्याचा भाऊ कुणाल गावडे व वडिल गजानन गावडे यांनी वेळोवेळी सहकार्य केले. फिर्यादी यांना त्यांच्या वडिलांच्या जागी नोकरीचा कॉल आला होता. परंतु तो लांब चंद्रपूरला असल्याने विराज गावडे याच्या सल्ल्याने तिने तो नाकारला होता. आता नोकरीही नाही आणि विराज याने लग्नच नाकारले आहे. सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने तपास करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.