पवारसाहेब बोलले अन् 'तो' प्रश्न अवघ्या १० सेकंदात सुटला !
मुंबई : खरा पंचनामा
"नाटकांच्यावरील जीएसटीचा प्रश्न बरेच दिवस सुटत नव्हता. मी याबाबत शरद पवार साहेबांना विनंती केली आणि अवघ्या दहा सेकंदात तो प्रश्न सुटला!" असे अभिनेते परेश रावल यांनी एक किस्सा सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले आहे.
परेश रावल यांची लल्लनटॉप या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला. 'शरद पवार मराठी असल्याने ते आर्टची सेवा करतील, असा मला विश्वास होता'. मी पवारांना मदत करण्यासाठी विचारले. त्यांनी, लगेच अरुण जेटली यांची अपॉइंटमेंट घ्या, मी तुमच्यासोबत येतो, असे म्हणाले. मी मराठी निर्माते अजित भुरेकर आणि त्यावेळी मोठे म्युझिक शो करणारे अशोक खांडेकर मिळून पवार साहेबांकडे गेलो. त्यांना भेटलो. आम्ही सव्वासात - साडेसात चहा घेतला. पवारांनी, जेटलींनी किती वाजता बोलावले आहे, असे विचारले. मी म्हटले, आठ वाजता... त्यावळी मी जेटलींना पवार येणार आहेत, असे सांगितले नव्हते. त्यावर पवारसाहेब म्हणाले, चला जाऊ, येथून केवळ ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. तिथे गेल्यानंतर, शरद पवार आले असल्याचे जेटलींना समजले. यामुळे ते लगेच आले. त्यावेळी शरद पवार म्हणाले, हा थिअटरचा प्रश्न आहे. त्यावर जेटली म्हणाले, हो मला याबाबत परेशने सांगितले होते. ठीक आहे, हो मी करतो.
मी म्हणालो, 'पवारसाहेब तुम्ही तर कमाल केली. ही तर व्होट बँक नाही.' त्यावर ते म्हणाले, ही कला आणि संस्कृतीची गोष्ट आहे. असा किस्सा सांगत परेश रावल यांनी, ही दादागिरी आहे. हे मराठी लोक आहेत, असे नमूद केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.