पोलिसाकडून 1.20 लाखांची खंडणी, आमदाराची तक्रार
पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली
चाळीसगाव : खरा पंचनामा
चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. चाळीसगाव पोलीस स्टेशनमधील एका पोलिसाने खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
भाजपचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारीची मागणी केली होती. या प्रकरणात पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. समाजाचं रक्षण करणारेच भक्षक झाल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकरणात संशयित पोलीस कर्मचारी अजय पाटील याने एका व्यावसायिकाकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 1 लाख 20 हजार रुपये खंडणी वसूल केली होती. व्यावसायिकाने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनीही पोलीस स्टेशनमध्ये या खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची तडकाफडकी बदली केली आहे.
भाजपचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी या प्रकरणाबद्दल ट्विट केलं आहे. 'रक्षकच भक्षक झाले, खंडणी उकळणाऱ्या पोलिसांना अभय नाही...' अशा आशयाचं आमदारांनी ट्विट केलं आहे. चाळीसगाव पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याने शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे ३ लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्कोच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये खंडणी उकळली होती. आमदार चव्हाण यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यांनी तत्काळ संबंधित तक्रारदार यांच्यासह शहर पोलीस स्टेशन गाठून चार तास ठिय्या दिला, यानंतर खंडणी उकळणारे संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील व त्याचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी याच्या घरातून त्याने खंडणी घेतलेले 1 लाख 20 हजार रुपये देखील त्याच्या घराच्या झडतीत हस्तगत करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.