Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 170 पोलीस अंमलदारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती सांगली, कोल्हापूर, साताऱ्यातील प्रत्येकी चौघांचा तर सोलापूर शहरमधील एकाचा समावेश

राज्यातील 170 पोलीस अंमलदारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती 
सांगली, कोल्हापूर, साताऱ्यातील प्रत्येकी चौघांचा तर सोलापूर शहरमधील एकाचा समावेश 

मुंबई : खरा पंचनामा 

विभागीय अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तसेच पोलीस उपनिरीक्षक गट ब (अराजपत्रित) पदोन्नती निवड सूचीतील पात्र 170 उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती झालेल्याना परिक्षेत्र वाटपही करण्यात आले आहे. पदोन्नती झालेल्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी चार जणांचा तर सोलापूर शहरकडील एकाचा समावेश आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया यादव पाटील यांच्या सहीने शुक्रवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.

सांगली जिल्ह्यातील मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील श्रेणी उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण यांचा यामध्ये समावेश आहे. कुलकर्णी यांना कोल्हापूर परीक्षेत्र तर चव्हाण यांची पुणे रेल्वे येथे पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. तर सुरेश पाटील यांची महामार्ग पोलीस आणि सुनिल कदम यांची तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रात पदस्थापना करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातील चौघांची पदोन्नतीने पदस्थापना झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.