सांगली जिल्ह्यातील 178 पोलीस अंमलदारांच्या बदल्या
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे आदेश
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील 178 पोलीस अंमलदारांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सहीने बदल्यांचे आदेश शनिवारी काढण्यात आले आहेत.
कार्यकाळ पूर्ण झालेल्या अंमलदारांचा बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे. बदली झालेल्यामध्ये 23 सहायक उपनिरीक्षक, 61 हवालदार, 13 नाईक, 81 शिपायांचा समावेश आहे. 178 पैकी 10 अंमलदारांना मुदतवाढ देण्यात आली आहे. बदली झालेल्यांमध्ये एलसीबीच्या 6 अंमलदारांचा समावेश आहे.
दरम्यान येत्या काही दिवसात विनंती बदल्याही करण्यात येण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.