Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चार पोलीस अधिकारी, 20 अंमलदार जखमी

चार पोलीस अधिकारी, 20 अंमलदार जखमी

सासवड : खरा पंचनामा

पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी शुक्रवार (दि. 2) पासून शासनाने ड्रोन सर्व्हे सुरू केल्याने प्रकल्पबाधित सातही गावातील ग्रामस्थांसह शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलनला शनिवारी हिंसक वळणही लागले.

गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तेथील परिस्थिती ही भावनिक झाली होती त्या भावनेतून पोलिसांवर हल्ला केला, त्यामध्ये 4 पोलीस अधिकारी 20 अंमलदार जखमी झाली आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. व पोलिसांच्या दोन गाड्या फोडल्या आहेत सहा आरोपी हे अटक करण्यात आले आहेत तसेच आणखी काही लोकांना अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्ष पंकज देशमुख यांनी माध्यमांना दिली.

पंकज देशमुख म्हणाले की, कुंभारवळण येथील महिला मृत्यूमुखी पडली आहे त्या महिलेच्या घरी जाऊन अधिकारी यांनी भेट दिली आहे. 15 दिवसांपासून ती महिला अत्यवस्थ होती. या महिलेचा प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कोणताही सहभाग दिसून येत नाही. गेल्या दोन दिवसाच्या आंदोलनामध्ये सहभागी नाहीत. निधनाची बातमी आल्यानंतर पोलीस माघारी परतत होते यावेळी शेतकरी यांनी बैल गाड्या पोलिसांच्या वाहनांसमोर लावल्या होत्या. यामधील काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली जर आम्ही अश्रुधुरांच्या कांड्यांचा वापर केला नसता तर अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले असते. सर्व घटनाक्रमाचे व्हिडिओ शूटिंग आहे.

शुक्रवारी (दि. 2) दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये अद्याप पर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा होती त्यामुळे अटक करण्यात आलेली नाहीत. बैलगाडा शर्यतीच्या दोन बैलगाड्या आणल्या होत्या त्या पोलिसांच्या अंगावर सोडण्यात आल्या होत्या दुर्दैवाने याच्यामध्ये ग्रामस्थांच्या अंगावर गेल्यावर तीन महिला जखमी झाल्या त्या संदर्भातले शुटिंग सुद्धा उपलब्ध आहेत असे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

सासवड पोलीस ठाण्यासमोर ड्रोन सर्व्हेच्या ठिकाणावरून पोलीस बंदोबस्त व महसूल अधकारी परत आल्यानंतर आंदोलनकर्तनी पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. अटक केलेल्या सर्वांना सोडण्यात यावे अशी मागणी यावेळी जमावाकडून करण्यात आली. तर सर्वांचा सहभाग पाहूनच सोडण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आंदोलकांना अधिकाऱ्यांकडून दिली असल्याची चर्चा होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.