Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रितू खोकर धाराशिवच्या तर तुषार दोषी साताऱ्याचे, योगेश गुप्ता कोल्हापूरचे अधीक्षक

राज्यातील 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 
रितू खोकर धाराशिवच्या तर तुषार दोषी साताऱ्याचे, योगेश गुप्ता कोल्हापूरचे अधीक्षक

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने गुरुवारी हे आदेश काढण्यात आले आहेत. सांगलीच्या अपर अधीक्षक रितू खोकर धाराशिवच्या तर तुषार दोषी साताऱ्याचे, योगेश गुप्ता कोल्हापूरचे अधीक्षक म्हणून बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.

बदली झालेले अधिकारी : 
राकेश ओला : पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर ते पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
सोमनाथ घार्गे : पोलीस अधीक्षक, रायगड ते पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर
आंचल दलाल : समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र.१. पुणे ते पोलीस अधीक्षक रायगड 
महेंद्र पंडीत : पोलीस अधीक्षक कोल्हापूर ते पोलीस उपायुक्त ठाणे 
योगेश कुमार गुप्ता : पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड ते पोलीस अधीक्षक कोल्हापूर 
बच्चन सिंह : पोलीस अधीक्षक, अकोला ते समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. ४, नागपूर
अर्चित चांडक : पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर ते पोलीस अधीक्षक, अकोला
मंगेश शिंदे : पोलीस उप आयुक्त, विशेष कृती दल (आर्थिक गुन्हे), बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर
राजतिलक रोशन : सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
बाळासाहेब पाटील : पोलीस अधीक्षक, पालघर ते पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण)
यतिश देशमुख : अपर पोलीस अधीक्षक, अभियान, गडचिरोली ते पोलीस अधीक्षक पालघर
सौरभ अगरवाल : पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग ते पोलीस अधीक्षक सीआयडी 
मोहन दहिकर : पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर ते पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग 
विश्व पानसरे : पोलीस अधीक्षक, बुलढाणा ते समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. ९, अमरावती
निलेश तांबे : पोलीस अधीक्षक सीआयडी नागपूर ते पोलीस अधीक्षक बुलढाणा 
समीर अस्लम शेख : पोलीस अधीक्षक सातारा ते पोलीस उपायुक्त मुंबई 
तुषार दोषी : पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे ते पोलीस अधीक्षक सातारा 
सोमय विनायक मुंडे : पोलीस अधीक्षक, लातूर ते पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, छत्रपती संभाजीनगर
जयंत मीना : पोलीस अधीक्षक एटीएस पुणे ते पोलीस अधीक्षक लातूर 
नितिन बगाटे : पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर ते पोलीस अधीक्षक रत्नागिरी 
रितु खोकर : अपर पोलीस अधीक्षक सांगली ते पोलीस अधीक्षक धाराशिव

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.