राज्यातील 4 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
दोन अधिकाऱ्यांना पदोन्नती
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील 4 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर दोन अधिकाऱ्यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. राज्याचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने शुक्रवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.
बदली झालेले अधिकारी कंसात कोठून कुठे :
सुनिल रामानंद : (अपर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय), महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे)
राजकुमार व्हटकर : अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, रा. रा. पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई)
के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना : (अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई)
प्रवीण साळुंके : (अपर पोलीस महासंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते अपर पोलीस महासंचालक, महामार्ग सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई).
पदोन्नतीने पदस्थापना झालेले अधिकारी :
प्रभात कुमार : संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ते संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई. (पद उन्नत करुन)
प्रशांत बुरडे : अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे ते पोलीस महासंचालक, लोहमार्ग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. (पद उन्नत करुन)
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.